बंद

    पुरवठा विभाग अंतर्गत योजना

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना

    योजना शिधापत्रिका रंग दरमहा धान्य लाभ
    अंत्योदय (AAY) पिवळी ३५ किलो प्रती शिधापत्रिका
    प्राधान्य गट बीपीएल (PHH-S) पिवळी प्रती लाभार्थी ५ किलो
    प्राधान्य गट केशरी (PHH) केशरी प्रती लाभार्थी ५ किलो

    अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

    १. शिवभोजन:

    • राज्य सरकारने गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली आहे.
    • या योजनेंतर्गत देण्यात येणा-या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व १ मूद भात ₹ १०/- इतक्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात येतात.
    • लाभार्थी: कोणतीही व्यक्ती
    • लाभ- सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 दरम्यान शिवभोजन केंद्रावर लाभ देण्यात येतो.

    अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

    २. फोर्टीफाईड राईस:

    • देश व राज्यातील ॲनिमियाच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्र शासनाने फोर्टिफाईड तांदळाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
    • तांदळाच्या पीठापासून बनविलेल्या एफआरके दाण्यांत लोह, फॉलिक ॲसिड व व्हिटामिन B12 मिसळलेले असून ते 1:100 प्रमाणात सामान्य तांदळात मिसळून पीडीएस, पीएम पोषण (एमडीएम) व आयसीडीएस अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येते.
    • लाभार्थी: राज्यातील अंत्योदय अन्न योजन व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थी.

    अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

    ३. एपीएल शेतकरी:

    • राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी थेट हस्तांतरणाची योजना.
    • लाभार्थी: केशरी शिधापत्रिकाधारक पात्र शेतकरी कुटुंब
    • फायदे: प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹१७०/- इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरण

    अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकेतील सदस्यांकरिता ekyc शिबिरांचे आयोजन

    • WhatsApp Image 2025-08-21 at 10.18.01 AM छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी ता. वाशी जि. धाराशिव.
    • WhatsApp Image 2025-08-21 at 10.18.28 AM मौजे येलकी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली
    • WhatsApp Image 2025-08-21 at 10.19.09 AM तालुका वसमत मुस्कान बचत गट, परभणी
    • WhatsApp Image 2025-08-21 at 10.19.46 AM गाव:- तिरुका ता. जळकोट जिल्हा लातूर