प्रशासकीय रचना
विभागीय आयुक्त कार्यालय
1) जिल्हाधिकारी कार्यालय (Collectorate)
उपविभागीय कार्यालये
तहसील कार्यालये
महसूल मंडळे / महसूल निरीक्षक
तलाठी कार्यालये
2) जिल्हा परिषद
पंचायत समित्या
ग्रामपंचायती
विभागीय आयुक्त हे विभागातील राज्य शासनाचे प्रमुख प्रतिनिधी आहेत.
————————————————————————————————————————————————————————————————-
विभागीय आयुक्तांची मुख्य कार्ये
प्रमुख जबाबदारी: विभागातील महसूल प्रशासन, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व करणे.
विकास योजना: गरिबी निर्मूलन, नागरी पुरवठा, रोजगार निर्मिती, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि शिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
समन्वय: शासन आणि जनतेच्या विविध संस्थांमध्ये योग्य आणि प्रभावी समन्वय राखणे.
समस्या निराकरण: विकास कार्यक्रमांतील अडथळे दूर करणे.
अपील प्रकरणे: महसूल विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कायदे आणि अन्य संबंधित प्रकरणांवर निर्णय घेणे.
नियंत्रण आणि मार्गदर्शन: जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद CEO, पोलिस अधीक्षक आणि नगर परिषदांचे प्रभावी पर्यवेक्षण.